Mon Nov 17 19:42:57 IST 2025
Rupali Thombre : पुण्यातून अत्यंत महत्वाची राजकीय घडामोड समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. पुढच्या 1 मिनिटात ट्विट करुन राजीनामा देते असंही त्या म्हणाल्या आहेत. राजीनामा दिल्यानंतर पोलीस आणि हे सरकार कसं काम करतं हे सगळ्यांच्या समोर आणणार असल्याची
असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. महिला आयोगा प्रमाणेच पोलीस देखील काम करायला लागले आहेत, असे रुपाली ठोंबरे म्हणाल्या. रुपाली ठोंबरे या खडक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या आहेत. पोलीस वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या दालनामध्ये रुपाली ठोंबरे बातचीत करत आहेत. यावेळी त्यांनी पोलीस वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या दालनामध्ये ठिय्या मांडल्याचे पाहायला मिळाले. मला अटक करा असेही त्या म्हणाल्या.
रूपाली ठोंबरे पाटील यांच्या बहिणीसह चार जणांविरुद्ध खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. माधवी खंडाळकर यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली पाटील खडक पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत पोलिसांना जाब विचारत आहेत. गुन्हा कसा दाखल केला? असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी केला आहे. पुण्यामध्ये नसतानाही रुपाली ठोंबरे यांच्यावरती गुन्हा दाखल केल्याने त्या आक्रमक झाल्या आहेत. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याने माझ्यावर चिखल उडवण्यात आला आहे असा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे. अजूनही रुपाली ठोंबरे पाटील पुण्यातील खडक पोलीस स्टेशनमध्ये बसून आहेत. त्यांची सध्या वरिष्ठ पोलिसांची चर्चा सुरु आहे.