Thu Jan 01 20:17:39 IST 2026
नागपूर : झी5 ची 'अंधार माया' ही पहिली मराठी हॉरर ओरिजनल सीरीज प्रेक्षकांना एका काळोख्या, गूढरम्य विश्वात घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे. 30 मे 2025 रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सीरीजचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते भिमराव मुडे यांनी केले असून एरिकॉन टेलिफिल्म्सअंतर्गत शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांनी निर्मिती केली आहे.
कथा व संवाद प्रल्हाद कुडतरकर यांचे असून स्क्रीनप्ले कपिल भोपटकर यांचे आहे. या सीरीजमध्ये दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे जबरदस्त अभिनेते किशोर कदम गूढ भूमिकेत दिसणार आहेत. झी5 ने थरकाप उडवणाऱ्या हलत्या वाड्यासह महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर अशा शहरांत कॅम्पेनचे आयोजन करत अंधार माया या मराठी हॉरर ओरिजनल सीरीजचे लाँच केले. या सीरीजमधल्या जुन्या वाड्याच्या हुबेहूब प्रतिकृतीमुळे प्रेक्षकांना या सीरीजमधल्या अंगावर शहारा आणणाऱ्या जगाची झलक अनुभवता आली. हा वाडा नागपूर मध्ये वर्धा रोड, कर्वे नगर रोड, फेतरी, सोमलवाड़ा अशा वेगवेगळ्या ठिकाणी दिसला व प्रेक्षकांना या सीरीजमधल्या थरारक गोष्टीमध्ये गुंतून जाणं शक्य झालं.
30 मे रोजी फक्त झी5 वर या सीरीजचा एक्सक्लुसिव्ह प्रीमियर होत असून ही सीरीज मराठी व हिंदी प्रेक्षकांसाठी भावना व रहस्याने परिपूर्ण कथा सादर करेल. या सीरीजमध्ये खातू कुटुंब कोकणातल्या गूढ वातावरणातल्या त्यांच्या जुन्या वाड्यात परत येतं आणि कुटुंबातल्या जुन्या रहस्यांच्या जाळ्यात अडकून जातं. वाड्यात विचित्र गोष्टी व्हायला लागतात आणि नाहीशाही होतात. कोकणातल्या लोककथेच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या सीरीजमध्ये भूतकाळ आणि वर्तमानकाळतल्या हिंदोळ्यावर एकच प्रश्न उभा राहातो आणि तो म्हणजे, हे घर स्वतःच हे सगळं घडवतंय, की त्यात एखाद्या दुष्ट शक्तीचा हात आहे? किशोर कदम म्हणाले, ?पछाडलेल्या वाड्याचा प्रवास घडवण्याची कल्पना अंधार मायामध्ये काय पाहायला मिळणार याची झलक देण्यासाठी चपखल आहे. या प्रवासानं मला सेटवरच्या रात्रीच्या, गूढ आणि थरारक वातावरणाची आठवण करून दिली. सीरीज लाँच करण्यासाठी अशाप्रकारचं नाविन्यपूर्ण कॅम्पेन कौतुकास्पद आहे.? शुभंकर तावडे म्हणाले, 'प्रेक्षकांबरोबर हा पछाडलेला वाडा अनुभवणं रोमांचक होते. परत एकदा अंधार मायाच्या विश्वात गेल्यासारखं वाटतं. या कॅम्पेननं सीरीजचा मूड अचूक पकडत प्रेक्षकांमध्ये वातावरणनिर्मिती केली आणि हे लाँच जास्त स्मरणीय बनवलं. मराठी आणि हिंदीमध्ये प्रीमियर होत असलेली अंधार माया टिपिकल हॉरर सीरीज नाही, ती रेंगाळते, कुजबुजते आणि लक्षात राहाते.' ऋतुजा म्हणाल्या, 'आमची आगामी मराठी हॉरर सीरीज - झी5 वरील अंधार मायाची कथा थरारक अनुभव देणारी आहे. भावनिकदृष्ट्या समृद्ध आणि अस्वस्थ करणारी कथा सतत गुंतवून ठेवते. पछाडलेल्या वाड्यासह महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करणं थरारक होतं. या प्रवासानं कितीतरी आठवणी परत आणल्याच, शिवाय दरम्यान या सीरीजची भीतीदायकता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आणि हे लाँच आणखी अविस्मरणीय बनवलं.' अंधार मायाचं थरारक रहस्य उलगडणार केवळ झी5 वर 30 मे रोजी