Mon Nov 17 19:42:56 IST 2025
नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला मा. मंत्री महोदय यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हा कार्यक्रम होईल.
या वेळेत मंत्री महोदय नागरिकांची निवेदने स्वीकारतील. मा. मंत्री महोदय नागरिकांना व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी, मागण्या लेखी स्वरुपातच (आवश्यक कागदपत्रे जोडून) आणाव्यात. तसेच आपली लेखी निवेदने मा. मंत्री महोदयांना द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी १ ते २ या कालावधीत ना. श्री. नितीन गडकरी आपल्या जनसंपर्क कार्यालयात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटतील.