फलटणमधील डॉक्टर तरुणीचा हॉटेलमधील शेवटचं CCTV फुटेज समोर

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2025-10-29 16:54:31
img

Phaltan Doctor Crime News: साताऱ्यातील फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने (Phaltan Doctor Crime New) राज्यभरात मोठी खळबळ उडाली आली आहे. सदर प्रकरणी विविध माहिती समोर येत आहे. याचदरम्यान आता डॉक्टर तरुणीने ज्या हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या सीसीटीव्हीमध्ये मयत डॉक्टर तरुणी एन्ट्री करत हॉटेलच्या रुममध्ये जाताना दिसत आहे.

हॉटेल मालकाने स्वत: आज सीसीटीव्ही फुटेज जाहीर केले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मयत डॉक्टर तरुणी हॉटेलच्या रजिस्टरमध्ये आपलं नाव लिहिताना दिसत आहे. नाव लिहिल्यानंतर तरुणी हॉटेलमधील रुमची चावी घेऊन जाते. याठिकाणी दरवाजा उघडताना डॉक्टर तरुणीला काहीतरी प्रॉब्लेम येतो. खोलीचा दरवाजा उघडण्याचा दोन-तीनवेळा प्रयत्न केल्यानंतर अखेर दरवाजा उघडतो आणि तरुणी खोलीत प्रवेश करते. यानंतरच मयत डॉक्टर तरुणी हॉटेलच्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या करते.

मधुदीप हॉटेलचे मालक दिलीप भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. या प्रकरणात आमच्या हॉटेलला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. सुरुवातीला पोलिसांना ज्यावेळेस पोलिसांना बोलावले त्यावेळी पोलिसांनी यायला उशीर होत असल्यामुळे आम्ही वकिलांचा सल्ला घेऊन रुम उघडली. त्यानंतर पोलिसांना पाचरण केले असता पोलीस लगेच आले. ही हत्या नाही तर आत्महत्या आहे. आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी गेली 30-35 वर्ष झाले सामाजिक कार्यात काम करतोय. चांगले निर्णय घेतले, त्याच्यामुळे काही लोक मला बदनाम करतात. आम्ही 23 ऑक्टोबरला मध्यरात्री दीड वाजता हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीला खोली दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता तिने कॉल केला होता, तोपर्यंत ती व्यवस्थित होती. रात्री हॉटेलमध्ये चेक इन करताना तिने सांगितले होते की, मला सकाळी साडेनऊ वाजता बारामतीला जायचे आहे. परंतु दुसऱ्या दिवशी दुपारी वाजता संशय आला त्यावेळेस आम्ही वकिलांच्या सल्ल्यानुसार दरवाजा उघडला, त्यावेळेस तिने फास घेतलेला पाहायला मिळाले. त्यानंतर तात्काळ आम्ही पोलिसांना पाचारण केलं आणि पोलिसांना आम्ही सगळे सहकार्य केल्याचे दिलीप भोसले यांनी सांगितले.

Related Post