Mon Nov 17 19:42:55 IST 2025
कळमेश्वर /नागपुर : 25 ऑक्टोंबर 2025 काल सावनेर विधानसभेतील कळमेश्वर येथील उड्डाणपूल (R.O.B.) आणि गोंडखैरी फाटा रस्ता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भव्य भूमिपूजन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
या वेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्य मंत्री आशिष जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी आमदार कृपाल तुमाने, माजी आमदार सुधाकर कोहळे, डॉ. राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, अशोक मानकर, सुधीर पारवे, दिनेश ठाकरे, अशोक धोटे, रामराव मोवाडे, अरविंद गजभिये, धनराज देवके, प्रकाश वरुळकर, किशोर रेवतकर, आदर्श पटले, सौ. मीनाताई तायवाडे, रोहित मुसळे, सौ. उज्वलाताई बोढारे, सौ. स्मृती ईखार, सौ. प्रगती मंडळ, प्रतीक कोल्हे, प्रमोद हत्ती, विलास महल्ले, महादेव ईखार आणि खंडेलवाल यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष ऊर्जादायी आणि प्रेरणादायी वातावरण लाभले. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक सुलभ, सुरक्षित आणि सुगम होणार आहे. या ऐतिहासिक कार्यासाठी सतत प्रयत्नशील राहिल्याबद्दल आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांचे कळमेश्वर येथील नागरिकांनी मनःपूर्वक आभार मानले.