Thu Jan 01 21:44:39 IST 2026
नागपूर : परखड मत व्यक्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व्यापारी व उद्योग विभागाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष आशिष मदान यांच निलंबन करण्यात आलं आहे. नागपूर शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी त्यांच निलंबन केल असून ते बेकायदेशीर आहे.
अलीकडेच अनिल अहिरकर यांनी नागपूर शहर कार्यकारिणीची घोषणा केली. पण, कार्यकारिणी घोषित करताना पक्षाची व्यापारी आघाडी आणि इतर आघाडी यांच्या अध्यक्षाच मत जाणून घेतलं नाही.
या संदर्भात व्यापारी आघाडी विदर्भ प्रदेश अध्यक्ष आशिष मदान यांनी परखड मत व्यक्त केलं. पण, त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे न देता शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून नियमबाह्य आशिष मदान यांच तात्पुरत निलंबन केलं. यावरून पक्षात समनव्याचा अभाव असून दुफळी निर्माण झालेली आहे. मदान यांचा निलंबनाने व्यापारी आघाडीत अस्वस्थता असून लवकरच इतर पदाधिकारी राजीनामा देण्याच्या प्रयत्नात आहेत.