Thu Oct 02 12:19:36 IST 2025
नागपूर : भारत देशात विविध जाती व धर्माचे लोक राहतात. पण, भाषिक वादामुळे देश हा विभागला गेला आहे. त्याला एकसंघ ठेवण्यासाठी हिंदीच भाषा ही महत्वाची असून तिला राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळायला हवा, असे मत सुप्रसिद्ध हिंदी कवी संतोष बादल यांनी व्यक्त केले.
रेशीमबाग चौकातील डॉ. एस.सी. गुल्हाने महाविद्यालयात "हिंदी भाषा दिना'निमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. डॉ. एस.सी. गुल्हाने महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. एस.सी. गुल्हाने हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बादल म्हणाले, "भाषावादामुळे उत्तर आणि दक्षिण भारत असा देश विभागला आहे. प्रादेशिक भाषावाद वाढत आहे. हा वाद केवळ हिंदी भाषामुळेच संपुष्टात येईल."
विद्यार्थ्यांनी इंग्रजीसह हिंदी भाषेला महत्त्व द्यावे. संवाद हा हिंदीतून करावा असे हिंदी भाषेचे महत्त्व डॉ. एस.सी. गुल्हाने महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. एस.सी. गुल्हाने यांनी अध्यक्षीय भाषणातून विशद केले. हिंदी भाषा ही जन्मजात भाषा आहे. हिंदी भाषेचं महत्त्व पटवून देण्यासाठी आपल्याला हिंदी दिवस साजरा करावा लागतो, असे मत प्रस्ताविकेतून डॉ. प्रवीण जोशी यांनी व्यक्त करून विदेशी भाषा आणि हिंदी भाषा यांच्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे समनव्यक नेहा समुद्रे या होत्या. यावेळी कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिगण उपस्थित होते.