मातंग समाजाला देणार न्याय : मुख्यमंत्री फडणवीस, किशोर बेहाडे यांच्या मागणीला प्रतिसाद

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2025-08-06 17:55:05
img

नागपूर : मातंग समाज आजही मुख्य प्रवाहापासून लांब आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणून या समाजाचा विकास करणार अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त फडणवीस यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानिमित्त मातंग समाजाचे व बीजेपी अनुसुचित जाती मोर्चाचे दक्षिण-पश्चिम विधान सभा अध्यक्ष किशोर बेहाडे यांनी मातंग समाजाच्या विकासा संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांवर फडणवीस यांनी यावेळी आश्वासन दिले. मातंग समाजाला न्याय देण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. सरकार या संदर्भात सकारात्मक आहे असा विश्वास व्यक्त करून फडणवीस यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनचरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी किशोर बेहाडे यांनीही संबोधित केले.

यावेळी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्थेचे विजय डोंगरे, सोनू वानखेडे, चेतन बेहाडे, गुंजन गणवीर, नैतिक गणवीर, आशा निखारे, राजू कांबळे, शरद अमोल दहिवले, अमोल गणवीर, क्षितिज मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Post