Sat Aug 02 07:23:17 IST 2025
नागपूर : मच्छिमार समाजाचे नेते प्रकाश लोणारे यांच्या नेतृत्वात विदर्भ मच्छिमार संघाच्या निवडणुकीत सहकार पॅनल निवडणूक रिंगणात उभे आहे. त्यांचा जाहीरनामा हा खलीलप्रमाणे आहे.
विदर्भ विभागीय मच्छिमार सहकारी संघ मर्यादित, नागपूर ही संस्था सहकारातील मत्स्य चळवळीचे प्रसाराचे काम करणारी विदर्भातील अग्रेसर सहकारी फेडरल संघीय संस्था म्हणून, दिनांक ०४ ऑक्टोबर १९६३ सालापासून कार्यरत आहे. या संघाच्या संचालक मंडळ सदस्यांची पंचवार्षिक निवडणुक शनिवार, दिनांक २६ जुलै २०२५ रोजी सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०५.०० या वेळेत होणार आहे. या निवडणुकीत आपल्या सहकारी संस्थेचे प्रतिनिधी /वैयक्तिक मतदार म्हणून आपली मतदार यादीत नोंदणी झालेली आहे. आणि आता मतदार म्हणून आपण फार महत्वाची भुमिका बजावणार आहात. म्हणून खालील नम्र निवेदन मा.श्री. प्रकाश लोणारे, मा.श्री. यशवंत दिघोरे व सहकारातील इतर ज्येष्ठ नेते यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलच्यावतीने आम्ही आपणास विनंती करीत आहोत.
विदर्भ विभागीय मच्छिमार सहकारी संघ मर्यादित, नागपूर ही सहकारातील कार्यकर्ते , पदाधिकारी, संचालक व सभासदांना मत्स्य सहकाराचे मार्गदर्शन देणारी संघीय संस्था आहे. अलीकडच्या काही वर्षांपासून सदर संघाच्या उत्पन्नास मर्यादा आल्यामुळे. त्याचा मुळ कामकाजावर परिणाम झालेला आहे. परिणामी अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतनसुध्दा वेळेवर संघ देवू शकला नाही. ज्याचा परिणाम संघाच्या ध्येय उद्दीष्टांची पूर्तता करण्यावर झालेला आहे, आणि अशा परिस्थितीत संघाच्या संचालक मंडळ सदस्यांची पंचवार्षिक निवडणुक होत आहे. उपरोक्त महत्वाच्या मुलभुत अडचणी सोडविण्यासाठी व संघात्त्या ध्येय उद्दीष्टांची पुर्तता करण्यासाठी नव नेतृत्वाची व जुन्या जाणत्या सहकारी नेत्यांचे मार्गदर्शन घेवून सहकार पॅनल आपणास आवाहन करीत आहेत की, संघाचे गत वैभव पुन्हा प्रात होण्यासाठी, ध्येय उद्दीष्टांची पुर्तता "सहकार पॅनलच्या" माध्यमातून करण्याचे अभिवचन आम्ही देत आहोत. संघाची जागा मौजा तेलंगखेडी येथील खसऱ्या मधील २ एकर जागा उपलब्ध करून देण्या बाबत मा. जिल्हाधिकारी नागपूर यांनी दिनांक २९ एप्रिल २०२५ ला शिफारस केलेली आहे. (आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्सालय, मत्स्य सहकारी प्रशिक्षण केंद्र प्रशिक्षणार्थीचे वस्तीगृह, कॉन्फेरंस हॉल, स्कीलडेव्हलपमेंट, फिशरीज ट्रेनिंग सेंटर, प्रशाशकीय कार्यालय) इत्यादी उद्देशाकरिता. यावर मा. आमदार डॉ. परिणय फुके यांनी दि. ३१/०५/२०२५ ला राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यावर दिनांक ०५/०६/२०२५ ला कार्यवाही बाबत रिमार्क करवून घेतलेला आहे. तसेच मा. सहआयुक्त मत्स्यव्यवसाय (भूजल) महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिनांक ०२/०६/२०२५ चे पत्रा द्वारे मा. उपसचिव (मत्स्य) पदुम १३, मंत्रालय मुंबई यांना शासनस्तरावर मा. मंत्री (मत्स्य) महोदयांना शिफारस केलेली आहे. या कामी श्री प्रकाश लोणारे यांनी सातत्य ठेऊन जिकरीचा पाठपुरावा केला आहे. म्हणून सहकार पॅनलच्या वतीने आपणास विनंती करण्यात येते की, शनिवार, दिनांक २६ जुलै २०२५ रोजी सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०५.०० या वेळेत होणाऱ्या मतदानात सहकार पॅनलची निशाणी कप बशी यावर शिक्का मारून सहकार पॅनल च्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, यासाठी हे नम्र निवेदन करीत आहोत.