आता गोवारी समाजाला मिळणार न्याय : किशोर बेहाडे; कैलाश राऊत यांची गोवारी समाज समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2025-07-11 13:16:40
img

नागपूर : महाराष्ट्र शासनाने गोवारी समाजातील आंदोलक कैलास राऊत यांची गोवारी समाज सनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली असून त्यांच्यामुळे आता समाज विकासाच्या दृष्टीने पुढे जाईल, असे मत भाजप दक्षिण पश्चिम अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष किशोर बेहाडे यांनी व्यक्त केले.

कैलाश राऊत यांची गोवारी समाज सनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्याच्या सत्काराप्रसंगी यावेळी ते बोलत होते. गोवारी समाजाला एकसंघ करण्यात राऊत यांचा मोठा हातभार आहे. त्यांनी केलेली आंदोलने. याची दखल शासनाला घेतली.. यावरून त्यांचं कर्तृत्व हे सिद्ध होते. आता त्यांना संविधानिक पद मिळाल्याने गोवारी समाजाचा विकास होईल, अशी आशाही किशोर बेहाडे यांनी व्यक्त केली.

यावेळी चिंतामण वाघाडे, शेखर लसुंते,संजय हांडे, ईश्वर गजबे , भास्कर राऊत, नंदकिशोर कोहळे, जयदेव राऊत आदी उपस्थित होते.

Related Post