ओबीसी महिलांचा सशक्तीकरणासाठी लढा, समाजासाठी आदर्श आचारसंहिता : डॉ. अशोक जीवतोडे यांची माहिती

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2025-06-12 10:52:03.0
img

चंद्रपूर : विदर्भातील चंद्रपुरात बुधवारी झालेल्या पहिल्या ओबीसी महिला अधिवेशनात ओबीसी महिलांनी समाजाला आदर्श आचारसंहिता घालून दिली. या आचारसंहितेत हुंडाबंदी, विवाह समारंभाची नियमावली व व्यसनाधिनता कमी करण्याचा प्रयत्न, या प्रमुख तीन विषयांवर ठराव घेण्यात आले, अशी माहिती मुख्य संयोजक डॉ. अशोक जीवतोडे यांनी सांगितली.

या अधिवेशनात ११ जिल्ह्यातील महिला प्रतिनिर्थीचा सहभाग होता हे विशेष. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रतिभा जीवतोडे होत्या. मंचावर अॅड. ज्योती सुंदरकर, शिवगंगा वाघ, निलीमा देवतळे, जीएसटी निरीक्षक अनुराधा गोंडे, मंजू कारेमोरे, स्वाती मारकवार, डॉ. रिता राऊत, वैशाली दळवे, मालिनी जाधव, ममता गायकवाड, शुभांगी नक्षीणे-उंभरकर, विद्या निंबार्ते, निजा गोहोकर, प्रतिभा ढंगळे, सायली देठे-बर्डे, वर्षा कोल्हे- जवळे आदी महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. अधिवेशनाच्या अध्यक्ष डॉ. प्रतिभा जीवतोडे यांनी ठरावांचे वाचन केले. संचालन मनीषा भोयर यांनी केले. ज्योत्स्ना लालसरे- राजुरकर यांनी आभार मानले.

ओबीसी महिलांनी हुंडा देणे किंवा घेणे बंद करण्याची शपथ घेऊन तसा ठराव पारित केला. विवाहातील खर्च कमी करावा व विवाह वेळेवर लावावा, अनावश्यक खर्च टाळण्यासाठी कमाल १००/२०० लोकांच्या उपस्थितीत विवाह करावा, असा निर्णय घेण्यात आला. कर्ज काढून न वः व अनावश्यक श्यक खर्च टाळावा, पारंपरिक वाद्य व लोककलावंतांना प्राधान्य द्यावा. विवाह, साखरपुडा व हळद एकाच दिवशी करण्याची योजनाही देण्यात आली. ओबीसी समाजात व्यसनाधिनता वाढू लागनी. याचा अनिष्ट परिणाम कौटुंबिक व समाजावर झाला. त्यामुळे व्यसनाधिनता दूर करण्यासाठी प्रबोधन वर्ग, व्यसन केंद्र बंदीख जनजागृती, आदी उपक्रम राबवावे. वृद्ध मातापित्यांना वृद्धाश्रमात टाकणाऱ्या कुटुंबावर बहिष्कार टाकावा, असा ठराव घेण्यात आला, अशी माहिती मुख्य संयोजक डॉ. अशोक जीवतोडे यांनी दिली

Related Post