मंत्री अविनाश गेहलोत यांच्या उपस्थितीत आयसीएसआय वेस्टर्न रिजन दीक्षांत समारंभ

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2025-06-11 21:13:06.0
img

नागपुर : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय) ने वेस्टर्न रिजनसाठीचा दीक्षांत समारंभ 11 जून रोजी नागपूर येथे आयोजित केला. या समारंभात सुमारे 380 तरुण सदस्यांचा सहभाग होता. राजस्थान सरकारचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री अविनाश गेहलोत यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून समारंभाची शोभा वाढवली.

नवीन सदस्यांचे अभिनंदन करताना गेहलोत म्हणाले, "कंपनी सेक्रेटरी हे कॉर्पोरेट क्षेत्रातील नैतिक आधारस्तंभ आहेत. 'सत्य बोला, धर्म पाळा' हे आपल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करताना सदैव लक्षात ठेवा. भविष्यातील वाटचाल ही आपल्या हेतू आणि कठोर परिश्रमांवर अवलंबून असते. म्हणून तुम्ही एक उत्कृष्ट व्यावसायिक होण्याचा प्रयत्न करा आणि सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करा." विद्यार्थ्यांना संबोधित करताना आयसीएसआयचे अध्यक्ष सीएस धनंजय शुक्ला यांनी नवीन सदस्यांना संधी स्वीकारण्याचे आणि या व्यवसाय तसेच आयसीएसआय संस्थेबाबत आपली जबाबदारी समजून घेण्याचे आवाहन केले. त्यांनी नमूद केले की आयसीएसआय आज जागतिक पातळीवर उत्तम गव्हर्नन्सचा प्रचार करणारी अग्रगण्य संस्था बनली आहे. आयसीएसआय अध्यक्षांनी भारतीय सशस्त्र सेना, निमलष्करी दल, अग्निवीर, शहीदांच्या कुटुंबीयांसाठी तसेच भारतीय सशस्त्र सेना व निमलष्करी दलातील जवानांच्या पाल्यांसाठी सीएस एक्झिक्युटिव्ह प्रोग्राममध्ये नोंदणीसाठी सुरू केलेल्या शुल्कमाफी योजनेबाबत माहिती दिली. तसेच जम्मू आणि काश्मीर, लडाख येथील विद्यार्थ्यांसाठी सीएसईईटी आणि सीएस एक्झिक्युटिव्ह कार्यक्रमात नोंदणीसाठी उपलब्ध असलेल्या योजनांबाबतही सांगितले. त्यांनी आयसीएसआयच्या हितधारकांसाठी अलीकडेच राबविण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या उपक्रमांचीही माहिती दिली. गुजरात मेरीटाइम युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेला 2 वर्षांचा पूर्णवेळ एमबीए कोर्स - मेरीटाइम रेगुलेशन आणि कंप्लायंस मॅनेजमेंट - जो सीएस अभ्यासक्रम आणि सागरी कायदे यांचा समावेश करून सीएस विद्यार्थींच्या रोजगार क्षमतेत वाढ करतो. एनआयएसएम (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स) यांच्या सहकार्याने संयुक्तपणे राबवलेला कॉर्पोरेट आणि सिक्युरिटीज मार्केट कंप्लायन्सेस (सीएसएमसी) एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल प्रोग्रामसाठी सर्टिफिकेट कोर्स - सीएस विद्यार्थ्यांसाठी कार्यान्वित.

यूएई बिझनेस मॅनेजर साठीचा आयसीएसआय सर्टिफिकेट कोर्स - जो विद्यार्थ्यांना युएईमधील व्यावसायिक संधींसाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य प्रदान करतो. आयसीएसआय गाइडिंग प्रिन्सिपल्स ऑन स्टुअर्डशिप (आयजीपीएस) -ज्यामध्ये पर्यावरणीय, सामाजिक व प्रशासनात्मक घटकांचा विचार करून जबाबदार गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. हे तत्त्वे संस्थात्मक गुंतवणूकदार व सेवा प्रदात्यांसाठी उपयुक्त आहेत. या समारंभात सीएस पवन चांडक, उपाध्यक्ष आयसीएसआय, सीएस बी. नरसिंहन, माजी अध्यक्ष आयसीएसआय, सीएस आशीष करोडिया व सीएस राजेश तारपारा, आयसीएसआयचे कौन्सिल सदस्य, सीएस आशीष मोहन, सचिव आयसीएसआय, सीएस ऋषिकेश वाघ, एनआयआरसी अध्यक्ष आणि सीएस सारा हुसेन कटावाला, आयसीएसआय नागपूर चॅप्टरच्या अध्यक्षा उपस्थित होते.

Related Post