Thu Jan 01 21:45:04 IST 2026
नागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी आता कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी सुरू झाली आहे. एका बाजूला पोलिसांच्या एसआयटीमार्फत तपास सुरु असतानाच, शिक्षण आयुक्तांनी स्वतंत्र चौकशी समिती नेमली आहे.
ही समिती लवकरच आपला अहवाल सादर करणार असून, त्याआधारे बनावट शिक्षक ओळखून दोर्षीवर कारवाईची. शिफारस केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात शिक्षण विभागाकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या तक्रारींवर शिक्षण विभागाकडून माहिती मागवून घ्या, आयपी अॅड्रेस ट्रेस झाल्यावर पोलिस विभागाकडून कारवाई करावी, अशी सूचना शिक्षण आयुक्त एसः सिंग यांनी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांना केली. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात चार आजी-माजी उपसंचालकांसह नऊजणांना अटक करण्यात आली असून, आणखी दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पोलिसांनी काहींना चौकशीसाठी बोलावून थेट अटक केली. अनेक दस्तऐवज ताब्यात घेतले. परंतु, पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईमुळे चौकशीवर परिणाम होत असल्याचे मत चौकशी समिती व शिक्षण आयुक्तांनी व्यक्त केले. त्यानंतर प्रधान सचिवांकडे माहिती देण्यात आली. प्रधान सचिवांनी पोलिस आयुक्तांशी चर्चा केली. त्यानंतर थेट शिक्षण आयुक्तांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. अनेक मुद्द्यांवर मुद्द्यांवर चर्चा झाली. चौकशी केल्यावरच आरोपींना अटक करण्याची सूचना शिक्षण आयुक्तांनी केली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चिंतामण वंजारींच्या अटकेसोबत प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसेंवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यावरही चर्चा झाली. शिक्षण विभागाशी संबंधित असलेल्या तकारीवर आधी शिक्षण विभागाकडून अहवाल मागवून घेतला पाहिजे. काही प्रशासकीय बाबी असल्याने त्यांची माहिती घ्यावी. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी. त्याचप्रमाणे शालार्थ आयडी प्रकरणात आयपी अॅड्रेस ट्रेस झाल्यावर कारवाई करण्याची सूचना शिक्षण आयुक्तांनी पोलिस आयुक्तांना केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.