Thu May 01 16:44:29 IST 2025
आजनसरा : संत भोजाजी महाराज देवस्थानला लवकरच तीर्थ क्षेत्राचा 'ब' दर्जा देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे आज केले.
संतनगरी आजनसरा येथे शुक्रवार 25 एप्रिल ला ब्रम्हलीन श्री संत भोजाजी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा मोठया श्रद्धेने साजरा करण्यात आला, देवस्थान कमेटीचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत यांनी सपत्नीक महाराजांच्या समाधीचे ब्रह्ममुहूर्तावर विधिवत पूजन करुण पुण्यतिथी सोहळयाला सुरुवात करण्यात आली,यावर्षी प्रमुख म्हणून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खा. रामदासजी तडस, सुरेशभाऊ वाघमारे,आ. समिर कुणावार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मडावी, माजी सभापती मिलिंद भेंडे, भाजपा जिल्हा अध्यक्ष सुनील गफाट यांची विशेष उपस्थिती होती, बावनकुळे यांनी बोलतातांना सांगितले की संत भोजाजी महाराज हे अलौकिक श्रद्धेचे स्थान असून आज या स्थळी मी मंत्री म्हणून नाही तर महाराजांचा भक्त म्हणून आलो आहे, या तीर्थ क्षेत्राला लवकरच "ब" दर्जा देऊन सर्वतोपरी विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असून, अध्यक्ष डॉ. पर्बत यांच्या मागणीनुसार विकास आराखड्यानुसार निधी उपलब्ध करुन देणार आहो, पर्बत यांनी सम्पूर्ण आयुष्य महाराजांच्या सेवेत समर्पित केले आहे त्या साठी मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहील, येत्या 15 दिवसात ग्रामविकास मंत्री व पर्यटन मंत्री यांची मंत्रालयाच्या दालनात मिटिंग लावून, या देवस्थानला 'ब' दर्जा देऊन विकास निधी उपलब्ध करण्याचे नियोजन करतो व येत्या 5 वर्षात मंदिराचा कायापालट होईल अशी आपणास ग्वाही देतो असे ना. बावनकुळे यांनी सांगितले महाराजांच्या समाधी दर्शनासाठी पहाटे पासूनच भाविकांची रीघ लगली होती, काल्याचे कीर्तन आटोपल्यानंतर दुपारी एक वाजता पासुन महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली,
विदर्भात आध्यात्मिक दृष्टिने महत्वाचा मानल्या जानारा ब्रम्हलीन श्री संत भोजाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याची परंपरा हभप देवाज़ी महाराज यांनी १९५५ पसुन सुरु केली असुन आजही अखंडित पणे सुरू आहे, पुण्यतिथी सोहळ्यात, महाप्रसाद व दींडी स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशी सह इतर जिल्ह्यातून 1 लाख भाविकांनी उपस्थिती लवाली होती, त्यामूळे संपूर्ण आजनसरा संतनगरी भक्तिमय वातावरनाने न्हावुन निघाली होती, गावकारी आपसातील मतभेद विसरुन पुण्यतिथी महोत्सवात बालकांपासून ते वयोंवृद्ध व्यक्ति वाट्याला येईल ती सेवा करतांना दिसत होते, दिंडीसोहळ्याच्या मार्गात सडा रांगोळी काढून गावकरी येणाऱ्या भाविकांचे हसतमुखाने स्वागत करीत होते शुक्रवारला रात्री महाराजांची पालखी समाधी स्थळापासुन नगर परिक्रमा करन्यासाठी भजनी दिंडया भगव्या पताका व भोजाजी नामाच्या जयघोषात वारकरी सम्प्रदायाची पताका फड़कावित अकरा घोड्यांचा ताफा व १५ बँड पथकच्या उपस्थितीत पालखीचे रिंगन व दिंडी स्पर्धा घेऊन सकाळी ८ वाजता श्रींच्या समाधीस्थळी पोहचाल्यानंतर दही हांडी फोण्यात आली, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवस्थानचे सचिव शिवदासजी पर्बत, उपाध्यक्ष धनराज मेश्राम, राजेंद्र ढवळे, नामदेव गाढवे, रमेश ठाकरे, रामाजी कोपरकर, विनोद आष्टनकर, शालिनीताई ईखार,श्रावण काचोळे, महेश कोसूरकर यांच्या सह गावाकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले