Thu Jan 01 23:16:22 IST 2026
पुणे : जरांगे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत शिंदे समिती बरखास्त करावी अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. आता पर्यंत मिळालेले कुणबी प्रमाणप्रत्र खोटे असल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी शिंदे समिती बरखास्त करावी अशी मागणी केली आहे.
आज मंत्री छगन भुजबळ पुण्यातल्या शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम आहे. त्यांनी आज पत्रकारांना सोबत संवाद साधला, त्या दरम्यान त्यांनी पुन्हा शिंदे समिती बरखास्त करावी अशी मागणी केली आहे. जातीने कुणबी असलेल्या लोकांना कुणबी प्रमाण पत्र शोधून त्यांना कुणबी प्रमाण पत्र द्यावं अशी मूळ मागणी होती. सगळं तपास व्हावा यासाठी न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाली. समितीच काम सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी जाहीर केलं की ५ हजार कुणबी प्रमाण पत्र मिळाली आणि तेलंगणामध्ये निवडणूक सुरू असल्यामुळे त्यांना जात येत नाही. काही लोकांनी आग्रह धरला की ते साडे अकरा हजार झाले. नंतर हे वाढत गेला, परंतु आम्ही त्यांना जिल्हा जिल्हात जाऊन कुणबी प्रमाणपत्र शोधायला नव्हत सांगितलं. महाराष्ट्रातल्या कुणबी लोकांनी या पूर्वीच प्रमाण पत्र काढले आहेत. निजामशाही आणि वंशावळ प्रमाणे पत्र मिळाली आहेत त्यामुळे आता समितीच काम संपलं आहे. आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी आम्ही कधी मान्य केली नाही आणि करणार ही नाही.
शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केलीय. मात्र याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच मत काय आहे, ते याबाबत अनुकूल आहेत का? असं विचारल्यावर छगन भुजबळांनी उत्तर देण्याच टाळलय. हिंगोलीची सभा आटोपून मी थेट पुण्यात आलो असं म्हणत त्यांनी स्पष्ट बोलण्याच टाळलय. जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना म्हणजे गृहविभागाचे अपयश असल्याच भुजबळ म्हणालेत.