Fri Aug 01 23:39:40 IST 2025
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुकीतील उमेदवारांसाठी खर्च मर्यादा जाहीर केली आहे. सरपंचपदासाठी ग्रामपंचायतींच्या सदस्यसंख्येनुसार 50 हजार ते 1 लाख 75 हजार रुपयांपर्यंत, तर सदस्यपदाच्या निवडणुकीतील उमेदवारांसाठी 25 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया म्हणाले, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील सुधारणेनुसार आता सरपंचपदाची थेट निवडणूक घेण्यात येणार आहे.
सर्व ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या निवडणुकांसाठी आयोगाच्या 30 जुलै 2011 च्या आदेशानुसार सरसकट 25 हजार रुपये खर्च मर्यादा होती. त्यात आता सदस्यसंख्येनुसार बदल करण्यात आला आहे.