Fri Aug 01 23:12:25 IST 2025
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवार्इ सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने शतकाेत्तर राैप्यमहोत्सवानिमित्त तब्बल एक हजार ९७० किलाेच्या चॉकलेटचा माेदक गुरुवारी पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या कलादालनात साकारण्यात अाला. गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डचे अाॅफिशियल अॅडज्युडिकेटर स्वप्निल डांगरीकर यांनी मोदकाची पाहणी करून या विक्रमाची नाेंद करत त्याबाबतचे प्रमाणपत्र दिले.
हे प्रमाणपत्र पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना प्रदान केले. हाॅटेल मॅनेजमेंट काॅलेजचे प्राचार्य धर्मा गायकवाड, अक्षय माेरे यांच्यासह एकूण १८ जणांनी अाठ तासांत चाॅकलेटचा माेदक तयार करून हा विक्रम केला. डांगरीकर म्हणाले, यापूर्वी २००९ मध्ये स्पेनमध्ये एक हजार ४१ किलाेचा केक तयार करण्यात अाला हाेता. मात्र, श्रीमंत दगडूशेठ मंडळाने एक हजार ९७० किलाेचा मोदक तयार करून नवीन विक्रम प्रस्थापित केला अाहे.
बुधवारी (२३ अाॅगस्ट) दुपारी सुरू झालेली मोदक करण्याची प्रक्रिया रात्री साडेअकरा वाजता संपली. त्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात अाले असून संकेतस्थळावर लवकरच त्याची नाेंद हाेर्इल. शतकाेत्तर राैप्यमहाेत्सवनिमित्त विविध उपक्रम सुरू असून गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये माेदकाच्या केकची नाेंद हाेणे हा अानंददायी क्षण अाहे. हा माेदक भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार असल्याचे दगडूशेठ मंडळाचे अध्यक्ष अशाेक गाेडसे यांनी सांगितले.