Thu Mar 12 01:04:27 IST 2026
नागपूर : राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालककमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना 'अॅडत्हॉन्टेज विदर्भ'च्या जाहिरातीत स्थान मिळालेले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचेच छायाचित्र जाहिरातीचे मुख्य आकर्षणाचे केंद्र बिंदू आहेत. जाहिरातीत बावनकुळे यांना मुख्य स्थान मिळाले नसल्याने समर्थक नाराज असल्याची सूत्रांकडून माहिती आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे हेवीवेट मंत्री आहेत. त्यांच्याकडे महसुलाची धुरा आहेत. यापूर्वी हे ऊर्जामंत्री होते. त्यांनी त्यांच्याकाळात ऊर्जा खात्याला नवी उंची प्रदान केली. या खात्यांतर्गत विविध विकास कामे केलीत. म्हणूनच बावनकुळे यांची उर्जावनमंत्री म्हणून ओळख निर्माण झालेली होती. आज ते महसूलमंत्री आहेत. नागपूर जिल्ह्यात त्यांनी विकासकामांचा धडाका सुरू केलेला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यांनी नागपूर जिल्ह्यात विकासाची गंगा अवतरली. असा हा कर्तृत्ववान मंत्री असतानाही त्यांचे छायाचित्र 'अॅडत्हॉन्टेज विदर्भ'च्या मुख्य जाहिरातीतून वगळल्याने कुठेतरी कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मान न देणे आहे.
खऱ्या अर्थाने बावनकुळे यांनीच नागपूर नव्हे तर संपूर्ण राज्याचा आपल्या खात्याच्या अधिनस्त कामातून विकास केलेला आहे. आजही त्यांच्या मनात नागपूरसह विदर्भाचा विकासच असतो. सतत ते विकासासाठी झटत असतात. त्यांनी संपूर्ण आयुष्य विकासासाठी समर्पित केलेलं आहे. भविष्यात त्यांना महाराष्ट्राची मोठी जबाबदारी भेटू शकते. असा कर्तृत्वान मंत्री यांच्या कार्याकडे बघून येणाऱ्या काळात होणारा अॅडत्हॉन्टेज विदर्भ' च्या जाहिरातीत स्थान मिळावं ही अपेक्षा.