Mon Nov 17 17:46:54 IST 2025
Bacchu Kadu Farmer Protest : शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला घेऊन बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन (Bacchu Kadu Farmer Protest) सुरू केलं आहे. दरम्यान या आंदोलनकर्त्यांनी हैदराबाद महामार्ग आणि तिथून समृद्धीकडे जाणारा महामार्ग बंद पाडला आहे. अशातच भंडाऱ्याचे प्रहारचे जिल्हाप्रमुख अंकुश वंजारी यांच्यासह अन्य जिल्ह्यातील शेतकरी (Farmer Protes
आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांनी हा महामार्ग बंद केला असता या आंदोलनात वर्धा जिल्ह्याच्या देवरी मतदार संघाचे भाजप आमदार राजू बकाने (Raju Bakane) हे त्यांच्या वाहनात अडकले होते. मात्र, त्यानंतर आमदार बकाने हे त्यांच्या वाहनाला तिथेच सोडून सुरक्षारक्षकाच्या घेऱ्यात आंदोलनकर्त्यांपासून नजर चुकवून लपत जाण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी काही आंदोलकांच्या निदर्शनात आमदार बकाने पडले आणि त्यांनी आमदार बकाने यांना तिथेच अडवून धरलं. त्यानंतर प्रहारच्या या आंदोलनकर्त्यांनी भाजप आमदार बकाने यांना बच्चू कडू सोबत आंदोलनस्थळी नेत बसविले. दरम्यान, चार तासांपासून भाजप आमदार बकाने हे बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात आंदोलनस्थळी होते. यावेळी आमदार बकाने यांनी, आंदोलनकर्त्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे आणि येत्या अधिवेशनात हा मुद्दा मी लावून धरेल असे आश्वासन दिलं आहे.
नागपूरमध्ये (Nagpur) बच्चू कडू (Bacchu Kadu), राजू शेट्टी (Raju Shetti) आणि महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी (Farm Loan Waiver) भव्य मोर्चा काढलाय. अद्याप बच्चू कडू यांचे आंदोलन सुरूच असून अजूनही प्रहारच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला आहे. कालची (28) रात्र बच्चू कडू आणि आंदोलकांनी जामठा येथे महामार्गावर काढली आहे. कालच्या तुलनेत गर्दी कमी झाली असली तरी शेकडो ट्रॅक्टर आणि वाहनांसह आंदोलन महामार्ग रोखून बसले आहे. आज 12 वाजेपर्यंतचे अल्टिमेटम बच्चू कडू यांनी दिले आहे. त्यानंतर रेल्वे रोकोचा इशारा दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या आंदोलनासंदर्भात सरकार नेमकं काय पाऊल उचलतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.