Thu Mar 12 01:05:01 IST 2026
मुंबई : रिलायन्स इंडिस्ट्रीचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी जिओ एआय क्लाउड ऑफरची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गंत जिओ युजर्सना वेलकम ऑफर म्हणून तब्बल 100 जीबी क्लाउड स्टोरेज मोफत मिळणार आहे. जिओ एआय क्लाउड (Jio AI-Cloud Welcome offer) याच वर्षी दीपावलीच्या मुहूर्तावर लॉन्च केले जाणार आहे. जिओ कंपनीच्या या निर्णयानंतर या क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याआधी अॅपल कंपनीतर्फए आयक्लाऊड अंतर्गत फक्त 5GB पर्यंत फ्री स्टोअरेज दिले जाते . गुगलतर्फे आपल्या युजर्सना फक्त 15GB फ्री क्लाऊड स्टोअरेज दिले जाते. मात्र आता जिओतर्फे त्यांच्या युजर्सना वेलकम ऑफर अंतर्गत तब्बल 100 जीबी फ्री क्लाऊड स्टोअरेज दिले जाणार आहे.
क्लाऊड स्टोअरेजच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा डेटा स्टोअर करता येतो. क्लाऊड स्टोअरेजमध्ये डेटाला डिजिटल पद्धतीने सुरक्षित ठेवले जाते. क्लाऊड स्टोअरेजच्या मदतीने मोबाईल फोन किंवा कॉम्यूटर वापरकर्ते एका वेगळ्या सर्व्हरवर त्यांचा डेटा सेव्ह करून ठेवतात. या सर्व्हरची देखभाल एका थर्ड पार्टीकडून केली जाते. इंटरनेटच्या माध्यमातून संबंधित युजरला हा डेटा वापरता येईल, याची खबरदारी घेतली जाते.