Thu May 01 16:45:45 IST 2025
मुंबई : पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार प्रकल्पासाठी १० हजार कोटी रुपये खर्च येणार ३५१ किलोमीटर पालखी मार्गाचा विकास होणार पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून लाखो वारकरी ठिक ठिकाणाहून तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या इतर संतांच्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात. अनेक वर्षे पालख्या ज्या मार्गानं पंढरपूरला येतात,
तो मार्ग खाच खळग्यांनी भरलेलाय. त्यामुळेच हे पालखी मार्ग सुविधाजनक करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला.
त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले. याकरिता महायुती शासनाने दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिलय