Thu May 01 16:16:36 IST 2025
नांदेड : उत्तर महाराष्ट्रातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नसल्याने राज्य सरकारने मराठवाड्याच्या हक्काचे पाणी विनाविलंब सोडावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.
त्यामुळे जायकवाडीला ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचा २० ऑक्टोबर २०२३ रोजीचा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचा निर्णय कायम आहे. आज मराठवाड्यामध्ये तीव्र पाणी टंचाई आहे, शेतकरी अडचणीत आहेत, पिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने मराठवाड्याच्या हक्काचे पाणी विनाविलंब सोडण्याचा निर्णय घ्यावा, अशी माझी मागणी आहे.