Thu May 01 16:26:58 IST 2025
नाशिक : आम्ही शेतकऱ्यांसोबतच आहोत. प्रशासनाला तातडीने मदत करायला लावू असे म्हणता, या गद्दारांनी खोके केवळ स्वत: साठी ठेवलेत मदतीला दिले नाहीत, असा प्रहार आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केला.
आदित्य ठाकरे गुरुवारी नाशिक येथील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांच्या मागण्या, त्यांचं झालेल्या नुकसान याबाबतची माहिती घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पांढुर्ली येथील शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना कोणीही धीर सोडू नका; उद्धव साहेबांनी फक्त तुमच्यासाठी आम्हाला येथे पाठवले आहे. याशिवाय त्यांनी सरकारवर देखील निशाणा साधला.
गद्दारांनी खोके त्यांच्याजवळ ठेवले मदतीला दिले नाहीत. पण आम्हाला राजकारण करायचं नाही. ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि याबाबतचा आवाज आम्ही विधानसभेत उठून असा शब्द आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी शिंदे ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी शिंदे ग्रामस्थांनी राज्य सरकारबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्हाला मदत सोडा, भेटायला पण मुख्यमंत्री आले नाहीत, असं गाऱ्हाणं या ग्रामस्थांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे मांडलं.