Thu May 01 16:45:44 IST 2025
नागपूर : पूर्व नागपूर शिवसेना प्रमुख हरीश रामटेके यांचे मावसभाऊ व राष्ट्रवादीचे विजय गजभिये यांचे आते भाऊ प्रफुल ढाकणे यांंचा संशयास्पद मृत्य झाला असून, या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी प्रफुलचे वडील प्रभुजी ढाकणे यांनी केली.
प्रफुल प्रभुजी ढाकणे यांंना डोक्याला जबर मार मारल्याने, गेल्या 21 दिवसांपासून त्यांचा उपचार नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात वार्ड नंबर 28 येथे उपचार सुरू होता, मात्र आज रात्री त्यांचे निधन झाले. सहा जुलैला आर.बी. बार वाठोडा रिंग रोड येथील रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फुटपाथवर संशयास्पदरीत्या प्रफुल ढाकणे आढळून आले. त्यांच्या मित्रांनी प्रफुल च्या वडिलांना फोन करून अपघाताची माहिती दिली, मात्र अपघात हा नेमका रोडवर कोणत्या बाजूने झाला हे सांगायला त्याचे मित्र अपयशी ठरले. डॉक्टरांच्या मेडीकल रिपोर्टनुसार प्रफुल्ल च्या डोक्याला तिन्ही बाजूंनी जबर गंभीर दुखापत होती.
त्याच्या डोक्याचे दोन ऑपरेशन यशस्वी झाले मात्र शारीरिक कमजोरी असल्याने आज त्यांनी शेवटचा श्वास घेतला. याबाबत प्रफुल चे वडील प्रभुजी ढाकणे यांनी नंदनवन पोलिस स्टेशन येथे अज्ञात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. संशयास्पद रित्या झालेल्या खूनाचा नंदनवन पोलिस तपास करीत आहेत.