Thu Jan 01 21:38:38 IST 2026
नागपूर : शंभर कोटी वसुली आरोप प्रकरणी आज शनिवार (२४ एप्रिल) रोजी सकाळी सीबीआयने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई येथील बांद्रा, परळी आणि नागपूर येथील घरांवर धाड टाकल्याची माहिती आहे.
मुंबईचे माजी पोलीस म आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर राज्यात खळबळ निर्माण झाली. या प्रकरणी अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला.
अनिल देशमूख हे राष्ट्रवादी कांग्रेसचे विदर्भातील मोठे नेते आहेत. शरद पवार यांचे ते खास निकटवर्तिय आहेत. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची प्रतिमा मालिन झाली आहे असून विरोधकांना आयते कोलित हाती मिळाले आहे.