Thu Jan 01 21:44:38 IST 2026
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने आज (ता . १६) नागपूर रेल्वेस्थानकावर आलेल्या १२६१६ नवीदिल्ली- चेन्नई जी.टी. एक्सप्रेसच्या सामान्य डब्यातून सत्तर हजार किंमतीचा तंबाखू पकडला. आरपीएफचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतिजा यांचे मार्गदर्शन व नेतृत्त्वात उपनिरीक्षक के.एन. राय आरपीएफ जवान विकास शर्मा, शशिकांत गजभिये व बी.एस. यादव यांनी ही कारवाई केले.
आरपीएफचे जवान नागपूर रेल्वेस्थानकावर दुपारी दोन वाजताच्या सुमारास आलेल्या जी.टी.एक्सप्रेसमच्या डब्यांची तपासणी करीत होते. यावेळी आरपीएफ जवान विकास शर्मा यांना सामान्य डब्यात बेवारस स्थितीत दोन पिशव्या आढळल्या. आजुबाजूच्या प्रवाश्यांना या पिशव्या बाबत विचारणा करण्यात आली.
प्रवाश्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्या पिशव्या आरपीएफ ठाण्यात आणल्या. त्याची तपासणी करण्यात आली. त्यात चोविस हजार किंमतीचे 'बाबा १६०' तंबाखूचे पन्नास पॅकेट आणि सत्तेचाळीस हजार किंमतीचे 'बाबा १२०' तंबाखूचे एकसे पस्तिस पॅकेट आढळले. आरपीएफने अश्या प्रकारे एकुण सत्तर हजार रुपये किंमतीचे एकसे पंच्यांशी पॅकेट पकडले.