Fri Aug 07 18:42:38 IST 2026
नागपूर : बसपाच्या कही हम भूल न जाये या राष्ट्रीय अभियानांतर्गत आज नागपूरच्या विधान भवन चौकातील गोंडराजे बक्त बुलंद शहा उईके यांच्या राजेशाही पुतळ्याला बसपाचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते एड वीरेश वरखडे, नागपूर लोकसभा प्रभारी अजय उईके, माजी नगरसेवक संजय जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
सतराव्या शतकात 1702 ला नागपूर परिसरातील राजापूर, रायपूर, हिवरी, हरपूर, वांजरा, सक्करधरा, आकटी, लेंडरा, फूटाळा, गाडगे, भानखेडा, सीताबर्डी आदी बारा वस्त्यांना (गावांना) एकत्र करून नागपूर नगरीची स्थापना केली. त्या गोंडराजे बक्त बुलंदशहा महिपत उईके यांची आज 324 वी जयंती. बसपा ने साजरी केली. बक्त बुलंदशहा हे मध्य प्रदेशातील देवगड येथून आले. त्यांनी आपल्या कार्यकाळात शहराच्या विविध भागात शुक्रवारी तलाव, फूटाळा तलाव, नाईक तलाव, सक्करधरा तलाव, सोनेगाव तलाव, पांढराबोळी तलाव, लेंडी तलाव आदि तलावांची निर्मिती केली. आज त्या तलावांची देखरेख सुद्धा केल्या जात नाही. एवढेच नव्हे तर एका पावसात शहरातील रस्त्यावर अनेक कृत्रिम तळ्यांची निर्मिती होत असल्याचे मनोगत याप्रसंगी बसपा नेत्यांनी व्यक्त केले.
अनुसूचित जाती, जमाती, अन्य मागासवर्गीय बहुजन समाजाने आपल्या राज्याचा आदर्श घेऊन शासक बनण्यासाठी प्रयत्न करावा असे याप्रसंगी बसपा नेते उत्तम शेवडे यांनी उपस्थितांना आवाहन केले. याप्रसंगी प्रामुख्याने दक्षिण पश्चिम चे मनोज गजभिये, जनार्धन मेंढे, श्यामराव तिरपुडे, भदंत डॉ धम्मोदय महाथेरो, रमेश पाटील, बंडू पोहनकर, सामाजिक कार्यकर्ते रोहित ईल्पाची, चंद्रशेखर केळझरे, शंभू गोंड कोहोचाडे उपस्थित होते.