डॉ. राजीव पोतदार यशस्वी डॉक्टर ते सामाजिक कार्यकर्ता

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2026-05-31 22:43:46
img

पूर्ण नाव :- डॉ. राजीव भास्करराव पोतदार. जन्मतारीख:- 05/06/1959 जन्मस्थळ:- खोलापूर, जिल्हा अमरावती (विदर्भ) शिक्षण:- MBBS (GOVT MEDICAL COLLEGE NAGPUR, 1982) FCGP ( ALL INDIA GOLD MEDALIST 1990) BA (Political Science, Psychology, English Literature 1980 ) पत्ता :- पोतदार नर्सिंग होम, त.कळमेश्वर,जि.नागपूर, महाराष्ट्र. पिन कोड. ४४१५०१ मोबाईल. न.:- 9422104900 / 9822104900

वैद्यकीय क्षेत्रातील कार्य  मुंबई येथे 1982 ते 1984 पर्यंत K.E.M, M.G.M, BARC, KASTURBA etc.हॉस्पिटल्स मध्ये हाऊस जॉब व रेसिडेन्सी केली.  1984 ते 1986पर्यंत अंकिसा, ता.सिरोंजा, जि.गडचीरोली. येथे मेडिकल ऑफिसर म्हणून नक्षलग्रस्त भागामध्ये राहून वैद्यकीय सेवा दिली.  1987 ते 1988 पर्यंत बडेगाव तालुका सावनेर जिल्हा नागपूर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून ग्रामीण भागामध्ये सेवा दिली .  1988 ते 1990 पर्यंत कळमेश्वर जिल्हा नागपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून पूर्णवेळ सेवा दिली.  1990 पासून आज पर्यंत कळमेश्वर जिल्हा नागपूर येथे पोतदार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल च्या माध्यमातून सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा देत एक प्रथित यश डॉक्टर म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये मान्यता.  वरील खाजगी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून एक्स-रे, ईसीजी, सोनोग्राफी, ऑपरेशन थिएटर, इत्यादी. अध्यायावत वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न माफक दरामध्ये ग्रामीण भागातील रुग्णांसाठी प्रामाणिकपणे केला.  स्वामी रामकृष्ण परमहंस संस्थेची स्थापना व संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करत असताना शासनाच्या विविध योजनांमधून गोरगरीब जनतेचे जवळपास 3000 लोकांचे हृदय शस्त्रक्रियेचे कार्य केले.  ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय कॅम्पचे आयोजन करून अनेक गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार देण्यासाठी गेल्या 35 वर्षांमध्ये प्रयत्न केले.  कोरोना काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून रोज 16 तास काम करत अविरत वैद्यकीय सेवा माफक दरामध्ये दिली.  सध्या अतिशय व्यस्त असताना सुद्धा सकाळी 8 ते 2 या काळामध्ये स्वतः हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहून वैद्यकीय सेवा अविरतपणे देण्याचा प्रयत्न सुरू आह राजकीय क्षेत्रातील कार्य  सन 1994 पासून राजकीय क्षेत्रातील कार्याला सुरुवात केली.1995-1999 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा शिवसेना युतीचा गावोगावी जाऊन प्रचार केला व सभा घेतल्या.  महाराष्ट्रामध्ये सन 1995 ते 1999 च्या दरम्यान असलेल्या युती शासनाच्या काळामध्ये आदरणीय नितीनजी गडकरी, पालकमंत्री, नागपूर जिल्हा, असताना शासन दरबारी लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी व विकास करण्यासाठी योगदान दिले.  सन 2000 ते 2003 या काळामध्ये विपरीत परिस्थितीमध्ये भाजपा कळमेश्वर तालुका अध्यक्ष म्हणून गावां-गावांमध्ये भारतीय जनता पार्टीचे संघटन उभे करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले व पार्टीचा जनाधार वाढवला.  कळमेश्वर नगरपालिकेच्या इतिहासामध्ये सन 2002 मध्ये पहिल्यांदा भाजपा सेना युतीची सत्ता प्रस्थापित करत भाजपाचे नऊपैकी नऊ नगरसेवक निवडून आणले.  सन 2002 ते 2007 पर्यंत कळमेश्वर नगरपालिकेचा को-ऑप्शन मेंबर म्हणून कार्यरत.  सन 2007 ते 2012 पर्यंत कळमेश्वर नगरपालिकेचा निर्वाचित नगरसेवक म्हणून कार्य करत नगरपालिका क्षेत्राच्या विकासासाठी चांगले योगदान दिले आहे.  सन 2003 ते 2009 पर्यंत नागपूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचा महामंत्री म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये सक्रियपणे कार्य करत पक्ष संघटनेचा विस्तार करण्यासाठी स्वतःला झोकून दिले. तसेच लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती व विविध सहकारी क्षेत्रातील निवडणुका यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये सहभाग घेतला.  सन 2009 ते 2012 पर्यंत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून काम केले, तसेच या काळामध्ये नागपूर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष म्हणून श्री चंद्रशेखरजी बावनकुळे असताना नागपूर जिल्हा भाजपाचा प्रभारी म्हणून सुद्धा सक्रियपणे काम केले.  सन 2013 ते 2019 पर्यंत नागपूर जिल्हा ग्रामीण चा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून सलग सात वर्ष जबाबदारी पार पाडली.  अनेक मोर्चे, आंदोलने, चक्काजाम, जेलभरो इत्यादीच्या माध्यमातून सन 2000 ते 2014 पर्यंत काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामध्ये जनमानस तयार करण्यासाठी कार्य केले.  2014 व 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रामटेक लोकसभा क्षेत्रातून उभे असलेले महायुतीचे उमेदवार श्री कृपाल तुमाने यांना निवडून आणण्यासाठी निवडणूक प्रमुख म्हणून तत्परतेने कार्य केले.  जिल्हाध्यक्ष म्हणून प्रचंड प्रवास, बैठका, जाहीर सभा, निवडणुकीचे व्यवस्थापन व संघटन कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले.  सन 2019 मध्ये सावनेर विधानसभा मतदार संघाचा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून अतिशय ताकतीने निवडणूक लढवली व 87000 मत घेतली परंतु विजयश्री मिळाली नाही.  सन 2020 ते आज पर्यंत महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचा कार्यकारणी सदस्य म्हणून कार्यरत. तसेच या काळामध्ये पक्षाने जी जी जबाबदारी सोपवली ती पूर्ण क्षमतेने पार पाडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.  20 नोव्हेंबर 2024 च्या सावनेर विधानसभेच्या कॉंग्रेसच्या उमेदवार सौ.अनुजा सुनील केदार यांच्या विरोधातील अतिशय अटीतटीच्या निवडणुकीमध्ये निवडणूक प्रमुख म्हणून पूर्ण निवडणूक नियोजनबद्ध पद्धतीने लढवत डॉ.आशिषराव देशमुख यांच्या विजयासाठी सर्वकष प्रयत्न केले व त्यांना निवडून आणण्यासाठी सगळ्यांना सोबत घेत अभूतपूर्व यश संपादन केले व त्यांचा 26401 मतांनी ऐतिहासिक विजय झाला. सहकार व आर्थिक क्षेत्रातील कार्य  सन 1999 मध्ये कळमेश्वर नागरिक सहकारी पतसंस्थेची स्थापना कळमेश्वर येथे केली. केवळ 1 लाख रुपये चे भाग भांडवल पासून सुरुवात करत आज पाच कोटीच्या वर भाग भांडवल, 100 कोटीच्या वर वार्षिक उलाढाल अशी नेत्रदीपक प्रगती संस्थेने केली आहे, सन 1999 पासून तर आज पर्यंत संस्थेचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे, तसेच जनतेचा व भाग भांडवलधारकांचा विश्वास संपादन करत अतिशय पारदर्शी पद्धतीने संस्थेचा कार्यभार चालवत संस्थेला उर्जित अवस्था प्राप्त करून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. सध्या संस्थेचे 2005 सभासद असून गरजूंना व गरिबांना वैयक्तिक कर्ज, गृह बांधणी कर्ज, वाहन कर्ज, सोने तारण कर्ज इत्यादी अनेक सुविधांच्या माध्यमातून सर्वसाधारण सभासदांना त्यांच्या व्यवसायासाठी सहकार्य पतसंस्थेने केलेले आहे, तसेच दैनिक ठेव, बचत ठेव, मुदत ठेव इत्यादींच्या माध्यमातून अतिशय चांगली सेवा पतसंस्था देत आहे. पतसंस्थेची स्वतःची तीन कोटी रुपयांची इमारत कळमेश्वर मध्ये कार्यरत असून आता पतसंस्थेला नागपूर जिल्हा कार्यक्षेत्र म्हणून काम करण्याची परवानगी मिळाली आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील कार्य  1995 पासून कळमेश्वर तालुक्यातील पहिले K.Z.S. विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्यासाठी कॉलेजचा पदाधिकारी व संचालक म्हणून महत्त्वाचा सहभाग घेतला आहे व आज शासन मान्यता प्राप्त तसेच स्वतःची वास्तू असलेले अतिशय चांगले विज्ञान महाविद्यालय सुरू आहे व आजही संचालक म्हणून कार्यरत आहे.  विज्ञान प्रचार व प्रसाराचे कार्य करणारे डॉ.भाभा विज्ञान संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून या संस्थेच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, खगोलशास्त्राच्या कार्यशाळा, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मितीच्या कार्यशाळा दरवर्षी घेतल्या जातात. विज्ञान महाविद्यालय सुद्धा याच संस्थेमार्फत चालविण्यात येते.  सन 2008 पासून श्री.एम.डी. बोंडे पाटील बी.एड कॉलेजचा शुभारंभ कळमेश्वर येथे केला व या कॉलेजचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार अशोकराव मानकर कार्यरत आहे व मी या संस्थेमध्ये कोषाध्यक्ष म्हणून 2008 पासून कार्यरत असून अतिशय चांगले बीएड कॉलेज म्हणून या कॉलेजने जिल्ह्यामध्ये मान्यता मिळवली आहे.  सन 2012 पासून ग्रामीण भागातील मुलांना सी.बी.एस.ई चे शिक्षण मिळावे म्हणून प्रगती पब्लिक स्कूल ची स्थापना केली असून स्वतःच्या इमारतीमध्ये ही शाळा अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे व या स्कूलचा कोषाध्यक्ष म्हणून 2012 पासून कार्यरत आहे.  माननीय नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या लक्ष्मणराव मानकर संस्थेचा संचालक म्हणून कार्यरत असून या संस्थेद्वारे वनवासी क्षेत्रासाठी काढलेल्या एकल विद्यालयाच्या प्रकल्पात सक्रिय सहभाग आहे. सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील कार्य  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा लहानपणापासूनचा स्वयंसेवक आहे. अनेक संघ कार्यामध्ये हिरीरीने भाग घेतला आहे.  सन 2000 पासून कळमेश्वर नगरीमध्ये कार्यरत सातपुडा क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षापासून अनेक प्रकारच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक,भव्य दिव्य मनोरंजनाचे कार्यक्रम इत्यादीच्या माध्यमातून भरीव कार्य केलेले आहे. या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून व आता संचालक म्हणून अजूनही सक्रियपणे काम सुरू आहे.  व्यक्तिमत्व विकास. रचनात्मक चिंतन, बुद्धीप्रामाण्यवाद, पर्यावरण. वक्तृत्व कला, संमोहनशास्त्र, योगा व व्यायाम, आहारशास्त्र इत्यादी अनेक विषयावर ठीक ठिकाणी व्याख्यान व प्रबोधन केलेले आहे. कृषी क्षेत्रातील कार्य  सन 2012 मध्ये झालेल्या इस्रायल येथील आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनी मध्ये माननीय नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वामध्ये सहभाग घेतला, नंतरच्या काळामध्ये आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी तसेच जैविक शेती करण्यासाठी अनेक कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला व वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.  आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या ऍग्रो व्हिजन च्या दरवर्षीच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त लोक व शेतकरी सहभागी झाले पाहिजे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.  आदरणीय बाळासाहेब त्रिवेदी यांच्या प्रेरणेने सुरू केलेल्या सीड रुरल या संस्थेचा अध्यक्ष म्हणून कृषी क्षेत्रामध्ये चर्चासत्र व विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन. कौटुंबिक माहिती  पत्नीचे नाव:- डॉ. सौ. वर्षा राजीव पोतदार  शिक्षण :- MBBS, AFIH  कार्य :- Private industrial certifying surgeon.म्हणून संपूर्ण विदर्भामध्ये विविध उद्योगांमध्ये पिरियॉडिकल  Medical checkup चे काम करीत आहे.  मुलाचे नाव:- श्री. निशाद राजीव पोतदार.  शिक्षण :- University college of london (UCL) मधून B.Sc. ( Economics)  कार्य :- Working as senior portfolio manager at Balyasny Hedge Fund, Dubai.

Related Post