प्रा. राजकुमार घुले यांचा शिंदेसेनेत होणार पक्षप्रवेश

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2026-04-30 17:02:50
img

नागपूर : लोककलावंतांसाठी झटणारे तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे प्रा. राजकुमार घुले हे शिंदेसेनेत पक्षप्रवेश करणार आहे. विदर्भातील ज्येष्ठनेते मंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत हा पक्ष पक्षप्रवेश होणार आहे

. 3 मे रोजी पारडी पेट्रोल पंप जवळ, भंडारा रोड येथील विशाल सेलिब्रेशन हॉलमध्ये महाराष्ट्र राज्याचे मंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. गेल्या तीन दशकांपासून समाजकार्य, सांस्कृतिक चळवळ आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे प्रा. घुले हे लोक कला सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये हजारो कलावंतांचे मजबूत जाळे उभे राहिले आहे. गावोगावी शाखा स्थापन करून सांस्कृतिक प्रबोधनाच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या समस्या मांडण्याचे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले आहे.

राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपली छाप उमटवली आहे. पहिल्याच प्रयत्नात जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येत नागपूर जिल्हा परिषदेत त्यांनी विकासकामांचा ठसा उमटवला. त्यांच्या कार्यकाळात अनेक मूलभूत सुविधा, सामाजिक उपक्रम आणि विकास प्रकल्प यशस्वीपणे राबवले गेले, ज्यामुळे ते जनतेत लोकप्रिय ठरले. आता शिवसेना (शिंदे गट) मध्ये त्यांचा प्रवेश हा नागपूर जिल्हा आणि संपूर्ण विदर्भात पक्षासाठी मोठी ताक ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. विशेष म्हणजे, या भव्य सोहळ्याकडे विविध राजकीय पक्षांचे लक्ष् लागले असून, मोठ्या संख्येने कार्यकर्ते कलावंत आणि नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. या पक्षप्रवेशामुळे विदर्भातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता असून, शिवसेनेल नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Post