Tue Feb 03 00:37:16 IST 2026
चंद्रपूर : निवडणूक बंदोबस्तासाठी जाणाऱ्या होमगार्डसच्या बसचा भीषण अपघात झालेला आहे. या अपघातात एक जवानाचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत.
नांदेड जिल्ह्यातील एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येत आहे. निवडणूक बंदोबस्तासाठी गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्ड्सच्या बस क्रमांक MH 03: P3279 बसला नांदेड जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे येथे आपले कर्तव्य बजावून परत येत असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक सूत्राकडून माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये साधारणपणे अंदाजे 40 ते 45 होमगार्ड जवान प्रवास करत होते. नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत बस भरदाव वेगाने येत असता. बसचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.
यामध्ये अनेक होमगार्ड जखमी झाले असून, काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्राकडून घेतलेल्या माहितीनुसार चंद्रपूर पथकातील होमगार्ड जवान सुरज गेडाम यांची प्रकृती चिंताजनक आहे. अशी माहिती मिळाली. चंद्रपूर जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वरजी कातकडे सर आणि संबंधित तालुका समादेशक संजयजी कातकर सर व चंद्रपूर जिल्हा होमगार्ड प्रशासन सतत संपर्कात असून, होमगार्डच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती घेतली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप कडू शकले नाही. तरी, पोलीस प्रशासनाने तात्काळ मदतीचा हात दिला असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. चंद्रपर जिल्हा होमगार्ड प्रशासन तसेच पोलीस दलाने या घटनेची माहिती घेत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्ड जखमी जवानांना तात्काळ प्रशासनाकडून मोबदला सुद्धा द्यावा व ज्याप्रकारे पोलीस पोलीस विभागातील पोलीस प्रशासन मदत पुरवते त्याच प्रकारे होमगार्ड सैनिकांना सुद्धा मदत द्यावी. असे चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्ड जवानांचे मागणी आहे.