Sat Aug 02 07:26:48 IST 2025
नागपूर : खदान ज्योतीनगर येथे तडीपार गुंड गामा याने सट्टा अड्डा सुरु केला आहे. तहसिल पोलीसांच्या आशिर्वादाने त्याचा हा अड्डा सुरु असल्याची माहिती विश्वस्त सुत्रांनी दिली.
नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुगार यांनी असामाजिक तत्व आणि व्यवसायाविरोधात कारवाईचा धडाका सुरु केला आहे. असे असतानासुद्धा गामा (रा. भानखेडा) याने ज्योतीनगरात सट्टा अड्डा सुरु केला आहे. तहसिल पोलीस ठाण्या अंतर्गत हा भाग येतो. या नगरातील सुशिलाबाई बुर्रेवार किराणा दुकानाजवळ सट्याची खायवळी केली जाते. काही पोलीसांकडून हफ्ता वसुली केली जाते.
तेथील नागरीकांनी याविरोधात तक्रार देण्याच ठरविल होत. पण, गामाची दहशत आणि पोलीसांची हफ्ता वसुलीमुळे नागरीकांनी तक्रार देण्याच टाळल आहे. आता पोलीस आयुक्त अमितेशकुमार याविरोधात कुठल पाऊल उचलतात, हे बघाव लागेल.