Thu May 01 21:21:19 IST 2025
नागपूर : तंबाखूचे सेवन हे अजूनही एक गंभीर सार्वजनिक आरोग्याचं संकट आहे, जे अनेक जीवघेण्या आजारांना कारणीभूत ठरतं. हे कॅन्सरचं मुख्य कारण आहे, विशेषत: फुफ्फुसांचा कॅन्सर. पण तंबाखू सेवनाने तोंड, घसा, अन्ननलिका, पोट, ब्लॅडर, किडनी आणि पॅनक्रियाजमध्ये देखील कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.
तंबाखूमुळे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), इम्फायसेमा आणि क्रॉनिक ब्राँकायटिस यांसारखे फुफ्फुसांचे आजार होतात. तंबाखूचे सेवनहृदयविकार जसे की हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हायपरटेंशन यांना देखील कारणीभूत ठरतो. धूम्रपान प्रतिकारशक्ती कमकुवत करतं, त्यामुळे तंबाखू खाणारे न्यूमोनिया आणि टीबीसारख्या श्वसनविकारांना जास्त बळी पडतात. तंबाखू सेवनाने तोंडाच्या आरोग्यावरही परिणाम होतो जसे की हिरड्यांचे आजार, दातांचा रंग बदलणे आणि यामुळे तोंडाचा कॅन्सरदेखील होतो. तंबाखूचे प्रजनन क्षमतेवरही वाईट परिणाम होतात. वंध्यत्व, गर्भधारणेतील गुंतागुंत आणि वेळेपूर्वी बाळंतपण होण्याचा धोका वाढतो. तसेच यामुळे लैंगिक कमजोरी, वेळेआधी वृद्धत्व आणि स्किन डॅमेज होते. विशेषत: तंबाखूच्या धुराच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींनाही हा धोका असतो. विशेषतः लहान मुलांना मोठ्या प्रमाणात श्वसनविकार होतात आणि अचानक होणाऱ्या बालमृत्यूचा (एसआयडीएस) धोका उदभवतो.तंबाखूमुळे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), इम्फायसेमा आणि क्रॉनिक ब्राँकायटिस यांसारखे फुफ्फुसांचे आजार होतात. तंबाखूचे सेवनहृदयविकार जसे की हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हायपरटेंशन यांना देखील कारणीभूत ठरतो. धूम्रपान प्रतिकारशक्ती कमकुवत करतं, त्यामुळे तंबाखू खाणारे न्यूमोनिया आणि टीबीसारख्या श्वसनविकारांना जास्त बळी पडतात. तंबाखू सेवनाने तोंडाच्या आरोग्यावरही परिणाम होतो जसे की हिरड्यांचे आजार, दातांचा रंग बदलणे आणि यामुळे तोंडाचा कॅन्सरदेखील होतो. तंबाखूचे प्रजनन क्षमतेवरही वाईट परिणाम होतात. वंध्यत्व, गर्भधारणेतील गुंतागुंत आणि वेळेपूर्वी बाळंतपण होण्याचा धोका वाढतो. तसेच यामुळे लैंगिक कमजोरी, वेळेआधी वृद्धत्व आणि स्किन डॅमेज होते. विशेषतः तंबाखूच्या धुराच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींनाही हा धोका असतो. विशेषत: लहान मुलांना मोठ्या प्रमाणात श्वसनविकार होतात आणि अचानक होणाऱ्या बालमृत्यूचा (एसआयडीएस) धोका उदभवतो. या आरोग्य संकटाला उत्तर म्हणून आणि 31 मे रोजी साजरा होणाऱ्या जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर संपूर्ण मे महिना 'त्वरित निदान व प्रतिबंधात्मक काळजी' याविषयावर आरोग्यविषयक मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेची थीम 'सेव्ह युवर स्मोकर फ्रेंड अँड बिकम ए वॉकहार्ट-नागपूर लाईफ सेव्हर', ही आहे. ही मोहीम 1 मे ते 31 मे 2025 दरम्यान चालणार आहे. या आरोग्य संकटाला उत्तर म्हणून आणि 31 मे रोजी साजरा होणाऱ्या जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर संपूर्ण मे महिना 'त्वरित निदान व प्रतिबंधात्मक काळजी' याविषयावर आरोग्यविषयक मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेची थीम 'सेव्ह युवर स्मोकर फ्रेंड अँड बिकम ए वॉकहार्ट-नागपूर लाईफ सेव्हर', ही आहे. ही मोहीम 1 मे ते 31 मे 2025 दरम्यान चालणार आहे.
कार्डियोलॉजी कन्सल्टंट डॉ. नितीन तिवारी म्हणाले, "डॉक्टर म्हणून आम्ही दररोज पाहतो की तंबाखू व्यक्तीच्या हृदय आरोग्यावर किती वाईट परिणाम करतो. तंबाखू सेवनाने होणाऱ्या आजारांचे त्वरित निदान झाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात," इंटर्नल मेडिसिन व क्रिटिकल केअर कन्सल्टंट डॉ. जयेश तिमाणे म्हणाले, "तंबाखू शरीराच्या महत्वाच्या अवयवांना हळूहळू नुकसान पोहोचवतो. जनजागृती आणि नियमित तपासणी ही अशा आजारांना प्रतिबंध घालण्यातील महत्त्वाची पावले आहेत." वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरचे सेंटर हेड रवी बागळी म्हणाले, "ही मोहीम म्हणजे आरोग्यदायी नागपूरसाठी आमची बांधिलकी आहे. आपण एकत्र येऊन तंबाखूमुक्त मजबूत समाज निर्माण करू शकतो." या मोहिमेच्या अंतर्गत वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे विशेषज्ञ शैक्षणिक चर्चा व डिजिटल जनजागृती मोहीम राबवणार आहेत, ज्यामुळे तंबाखूमुक्त जीवनशैलीला प्रोत्साहन मिळेल. यामध्ये सामाजिक सहभाग वाढवण्यासाठी, ज्या व्यक्तीने किंवा डॉक्टरने सर्वात जास्त असामान्य तपासणीकरता रुग्णांचे रेफरन्स दिले असतील, त्यांना खास सरप्राईज गिफ्ट व एक मोफत आरोग्य कूपन (अटी व शर्ती लागू) देऊन सन्मानित केले जाईल. तसेच त्यांच्या जीवनरक्षक कार्याची दखल घेण्यासाठी त्यांच्याद्वारे दिला गेलेला संदेश वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर दाखवला जाईल.