Sat Aug 02 07:31:14 IST 2025
नागपूर : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबांनी यांनी पत्नी नीता अंबांनी यांना दिवाळी निमित्ताने Rolls Royce Cullinan SUV ही महागडी कार गिफ्ट केली आहे.
जगभरातील श्रीमंतांच्य यादीतही मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या टॉप 10 मध्ये समावेश होतो. मुंबईत मुकेश अंबांनी यांचं अँटिलिया नावाचं अलिशान निवासस्थान आहे. अंबांनी यांच्याकडे जगभरातील अनेक महागड्या आणि आधुनिक कार आहेत. आता दिवाळीनिमित्ताने अंबांनी यांच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका कारचा समावेश झाला आहे. उद्योगपती मुकेश अंबांनी यांचा Z+ सिक्युरिटीचा ताफा जेव्हा रस्त्यावरुन जातो, त्यावेळी त्यांच्या ताफ्यात अनेक महागड्या गाड्या पाहिला मिळतात. त्यांच्या ताफ्यात जगातील सर्वात सुरक्षित कारचा समावेश असतो. आता त्यांनी आपल्या पत्नीलाही महागडी कार गिफ्ट केली आहे. देशातील हे सर्वात महागडं दिवाळी गिफ्ट असल्याचं बोललं जातंय.
दिवाळी निमित्ताने उद्योगपती मुकेश अंबांनी यांनी रोल्स रॉयस कलिननच्या ब्लॅक बेज एडिशन एसयूवी गिफ्ट केली आहे. ही कार खूप सुरक्षित आणि महागडी कार मानली जाते. रोल्स रॉयसची किंमत कोटीच्या घरात असते. पण या कारची किंमत एक-दोन कोटी नाही तर तब्बल 10 कोटी रुपये इतकी आहे.