Thu Jan 01 21:44:09 IST 2026
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास १५ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली.
आतापर्यंत ११.८० लाख अर्ज प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील खात्याअंतर्गत पोलीस शिपाई, चालक अशा सुमारे १८ हजार पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबर ही अखेरची तारीख देण्यात आली होती.
मात्र, अर्ज करण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक राहिलेले असताना ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची वेबसाइट सतत हँग होणे किंवा सर्व्हर डाउन होणे, अशा विविध समस्यांना उमेदवारांना तोंड द्यावे लागत होते.