Thu May 01 19:32:00 IST 2025
मुंबई : टीम इंडियाच्या इंग्लंडविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवानंतर अवघ्या काही तासात संघाच्या एका सदस्यचा करार संपुष्टात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे ही व्यक्ती 4 महिन्यांपूर्वीच टीम इंडियाशी जोडली गेली होती.
भारतीय संघातील ती व्यक्ती आहे सपोर्ट स्टाफ मेंबर पॅडी अप्टन. पॅडी अप्टन हे टीम इंडियाचे स्ट्रेन्थ अँड कंडिशनिंग कोच होते. आशिया कपआधी जुलै महिन्यात पॅडी अप्टन यांची बीसीसीआयनं नियुक्ती केली होती. पण अवघ्या चारच महिन्यात त्यांचा करार संपवला आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला पुन्हा फॉर्ममध्ये आणण्याचं मोठं श्रेय पॅडी अप्टन यांना जातं. ते जुलै महिन्यात टीम इंडियामध्ये आले. त्यानंतर आशिया कपपासून विराट कोहलीचा फॉर्म परत आला. आशिया कपममध्ये विराटनं धावांचा आणि शतकांचा दुष्काळ तीन वर्षांनी संपवला. तर वर्ल्ड कपमध्येही त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला. या सगळ्यामागे पॅडी अप्टन यांचा मोठा हातभार आहे. पण इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया वर्ल्ड कपच्या मैदानात हरली आणि त्यांचा करारही संपला.