Thu Jan 01 21:44:39 IST 2026
नवी दिल्ली- शाओमी मोबाईल कंपनीने बहुप्रतिक्षित असलेले पहिले स्मार्टवॉच लाँच केले आहे. शाओमी अमेजफीट स्मार्चवॉचची किंमत आठ हजार १०० रुपये आहे. हे स्मार्टवॉच येत्या बुधवारपासून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.
शाओमीने हुआमीबरोबर हे स्मार्टवॉच बनवले आहे. हे स्मार्टवॉच वॉटरफ्रूप आहे. सर्वप्रथम चीनमध्ये या वॉच विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.
?शाओमी अमेजफीट स्मार्चवॉच?चे फिचर्स » १.३४ इंच डिस्प्ले » १.२ गिगाहर्टझ प्रोसेसर » ५१२ एमबी रॅम » चार जीबी इंटरनल मेमरी » ३००X३०० पिक्सल स्क्रिन रेझ्योल्यूशन » २०० एमएएच बॅटरी किंमत ? आठ हजार १०० रुपये