Thu Jan 01 21:38:27 IST 2026
न्यूयॉर्क- अॅपलचा ?आयफोन-७? आणि ?आयफोन ७ प्लस? हे फोन ७ ऑक्टोबरपासून भारतात विक्रीसाठी ठेवणार आहेत. या फोनची किंमत ६० हजार रुपये आहे. अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी ?आयफोन-७? व ?आयफोन ७ प्लस? या दोन फोनचे अनावरण केले. स्टेरिओ स्पीकर्स, पाणी व धुळीला प्रतिबंधक यंत्रणा, वायरलेस हेडफोन आदी या फोनची वैशिष्टये आहेत. १६ सप्टेंबरपासून जगातील २५ देशांमध्ये त्याची विक्री सुरू होईल.
?आयफोन-७?चा डिप्ले ४.७ इंचाचा असून ?आयफोन-७ प्लस?चा डिस्प्ले? ५.५ इंचाचा आहे. हे दोन्ही फोन सिल्व्हर, गोल्ड, रोज गोल्ड, काळ्या रंगात उपलब्ध आहेत. हे फोन अनुक्रमे ३२ जीबी, १२८ जीबी, २५६ जीबी क्षमतेचे आहेत. ३२ जीबी आयफोनची किंमत ६० हजार रुपये आहे.
?अॅपल वॉच सिरीज-२? हे घडय़ाळही बाजारात आणले आहे. यात फिटनेस व आरोग्याशी संबंधित माहिती नोंदवली जाणार आहे. या घडयाळावर पाण्याचा कोणताही परिणाम होणार नाही. भारतात या घडाळ्याची किंमत ३२९०० रुपये व ३४९०० रुपये असेल.