Thu Sep 18 02:26:02 IST 2025
बिजींग : व्यापाराच्या माध्यमातून जगभरात हातपाय पसरणा-या चीनने युरोपची बाजारपेठ काबीज करण्यासाठी थेट लंडनपर्यंत ट्रेन मालवाहतुक सेवा सुरु केली आहे.
चीनच्या पूर्व झीहीजियांग प्रांतातील यीवु येथून मालगाडीने लंडनासाठी प्रस्थान केले आहे. 18 दिवस 12 हजार किलोमीटरचा प्रवास करुन ही ट्रेन ब्रिटनला पोहोचणार आहे. कझाकस्तान, रशिया, पोलंड, जर्मनी, बेलजियम आणि फ्रान्स या देशांमधून ही ट्रेन जाणार आहे. यीवु टाईमेक्स इंडस्ट्रीयल इनवेसमेंट कंपनी ही ट्रेन सेवा चालवणार असल्याची माहिती चीन प्रसारमाध्यमांनी दिली आहे. सध्या या कंपनीकडून स्पेन माद्रिदपर्यंत ट्रेन मालवाहतूक सेवा चालवली जाते.
हवाई मार्गाच्या तुलनेत रेल्वेने मालवाहतुकीचा खर्च निम्म्यावर येतो तसेच समुद्रामार्गापेक्षा कमी वेळात माल पोहोचतो. ब्रिटनची युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु आहे. युरोपियन कंपन्यांच्या हातून बाजारपेठ निसटणार आहे. अशावेळी अब्जावधील डॉलर्सची चीनी गुंतवणूक ब्रिटनमध्ये आणण्याचा ब्रिटनच्या पंतप्रधानांचा उद्देश आहे. थेट चीन ते लंडन ट्रेन मालवाहतूक याच मोहिमेचा भाग आहे.