Sat Aug 02 07:35:40 IST 2025
नवी दिल्ली : पाकिस्तान भारताला पोकळ धमक्या देत असून प्रत्यक्षात भारताच्या कारवाईने पाकिस्तान आतमधून पार बिथरुन गेला आहे. अन्यथा पाकिस्तानने फोन करुन कारवाई थांबवण्याची भारताला विनवणी केली नसती.
पाकिस्तानने भ्याड हल्लाकरुन भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारताने केलेल्या कारवाईसमोर पाकिस्तानला अक्षरक्ष गुडघे टेकायला लावले. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी ही माहिती दिली.
मंगळवारी पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात भारताचे तीन जवान शहीद झाले. यातील एका शहीद जवानाच्या मृतदेहाची पाकिस्तानी सैन्याने विटंबना केली होती.