Thu May 01 16:05:28 IST 2025
कोल्हापूर : 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव यांचं कोल्हापूर-सांगली महामार्गावरील हालोंडीनजीक डंपरने धडक दिल्याने निधन झालं आहे.
कल्याणी जाधव यांनी 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेसह अनेक लोकप्रिय मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
काही दिवसांपूर्वीच कल्याणी जाधव यांनी 'प्रेमाची भाकरी' नावाने कोल्हापुरात हॉटेल सुरू केले होते. शनिवारी रात्री हॉटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिल्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे.